आदरणीय कै. विष्णू बाळकृष्ण तथा बापूसाहेब फडणीस यांना वसईमध्ये महिलांसाठी शिक्षक ट्रेनिंग कॉलेजची गरज जाणवली आणि ७ जुलै १९६५ रोजी बाजीपूर वनिता विनयालय हे अध्यापक विद्यालय सुरू झाले. शिक्षणमंत्री नामदार मधुकरराव चौधरी यांनी अध्यापक विद्यालयाचे उद्घाटन केले. सुरुवातीला न्यू इंग्लिश स्कूल व फडणीसवाडा या दोन ठिकाणी भरणारे अध्यापक विद्यालय १९७० मध्ये स्वत:च्या एक मजली व सर्व सोईनी युक्त अशा इमारतीत भरू लागले.