logo/error

समर्थ शिक्षा मंडळ आणि चॅरिटी ट्रस्ट कालिना

बाजीपूर वनिता विनयालय,डी.एल.एड. कॉलेज, वसई.जि.पालघर

("Samarth Shiksha Mandal and Charity Trust,Kalina
Bajipur Vanita Vinayalay D. El.Ed. College, Vasai, Dist- Palghar. ")

About Us

तात्विक (Theory) व प्रात्यक्षिक (Practical) या दोन्ही विभागात अध्यापक विद्यालयाचा नावलौकिक दर्जेदार होता. म्हणूनच १९६९–७० या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शासनाने अध्यापक विद्यालयाचे मूल्यमापन करण्यासाठी नेमलेल्या ‘श्रीमती सुलभा पाणंदीकर’ समितीने अध्यापक विद्यालयाची प्रशंसा केली व इमारत पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

अध्यापक विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत डी.एल.एड परीक्षेचा अंतिम निकाल दरवर्षी १००% लागला आहे.

बाजीपूर अध्यापक विद्यालयातर्फ़े राबवले जाणारे काही उपक्रम

बाजीपूर अध्यापक विद्यालय आठ दिवसांचे श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करीत आले आहे. शिबीरात श्रमदानासोबत मंडप उभारणे, स्वयंपाक घर सारवून व चुली मांडून तयार करणे, विजेची सोय, पाणी भरणे, चहा व नास्ता, स्वयंपाक, संडासबांधणी यासाठी बाहेरच्या एकाही माणसाची मदत न घेता अध्यापकाचार्य, छात्राध्यापक व शिपाई स्वकष्टाने करत. येणारा प्रत्येक पाहुणा नास्ता, जेवण व स्वच्छता यामुळे प्रभावित होऊन जातो. सकाळी ५.३० वा. प्रात:स्मरण व संध्या. ७ वा. रामरक्षा होते.

गेल्या काही वर्षात अध्यापक विद्यालयाने यशस्वीपणे आयोजन करून पार पाडलेली शिबीरे व तेथे केलेल्या कामांची माहिती पुढीलप्रमाणे

  • सत्फाळा - स्मशानभूमी रस्ता
  • बेलवाडी - आदिवासी पाड्यासाठी रस्ता
  • घाटेघर - पाड्यापासून शिवमंदिरासाठी रस्ता
  • मांडवी ( दोन वेळा) - स्मशान भूमीसाठी जागा तयार करणे
  • कण्हेर - खचलेला रस्ता दुरुस्त करणे
  • भारोळ - रस्ता तयार करणे इत्यादी

विशेष म्हणजे अतिशय दुर्गम भागात शिबीरे असूनही या शिबीरांना श्री. अण्णासाहेब जोशी, श्री. बाबासाहेब जोशी, श्री. प्रभुभाई संघवी, श्री. विजय जोशी इत्यादी संस्थेच्या विश्वस्तांनी भेटी दिल्या.

बाजीपूर अध्यापक विद्यालयाने आयोजीत केलेल्या शैक्षणिक सहली

डी.एल.एड. पदवीका अभ्यासक्रमाच्या कालखंडात राज्याबाहेर सहलीचे आयोजन हे अध्यापक विद्यालयाचे आणखी एक वैशिष्ट्य. अभ्यासक्रामास प्रवेशित सर्व छात्राध्यापक व सर्व अध्यापकाचार्य या सहलीत भाग घेतात. अध्यापकाचार्य सहलीतील जेवण, चहा, नास्ता हा खर्च स्वत:चा स्वत: करतात. पालकाना सहलीचे संपूर्ण वेळापत्रक दिले जाते व छात्राध्यापक ज्या स्थळांना भेटी देणार त्या स्थळांची सांस्कृतिक, ऐतिहासिक माहिती दिली जाते

  • मुंबई सीएसटी – बंगलोर – उटी - म्हैसूर – मिरज – कोल्हापूर - दादर
  • मुंबई सीएसटी – रेणुगुंठा – चेन्नई – म्हैसूर - बंगलोर – दादर
  • मुंबई – अहमदाबाद – अबू – बिकानेर – जयपूर – अजमेर – चितोडगड – उद्यपूर – अहमदाबाद – मुंबई.
  • वसई – कोल्हापूर – सिंधुदूर्ग – गोवा – वसई
  • लो. टिळक टर्मिनस – आग्रा – ग्वाल्हेर - सतना(खजुराहो) - जबलपूर – पिपारिया – मुंबई.
  • मुंबई सीएसटी – बंगलोर – उटी - म्हैसूर – मिरज – कोल्हापूर - दादर

अनेक सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे बाजीपूर अध्यापक विद्यालयाचे आणखी एक दालन!

  • बालगंधर्व संगीत - श्रीमती दीपा कार्लेकर
  • कवितेच्या गावा जावे - महेश केळुसकर, अरुण म्हात्रे, अशोक बागवे
  • अमृताचा वसा - . कौशल इनामदार
  • आरसा - मंगला खाडिलकर
  • मी सावित्री बोलतेय - सुषमा देशपांडे
  • अमृतगाथा - चंद्रकांत काळे व माधुरी पुरंदरे
  • वेध आकाशाचा - खगोलतज्ञ श्री. हेमंत मोने अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन बाजीपूर अध्यापक विद्यालयाने केले.

याशिवाय श्री. बा.भ.बोरकर, श्री. नारायण सुर्वे, श्री. शंकर वैद्य इत्यादी मान्यवर साहित्यकारांचे काव्यगायन, पं. महादेवशास्त्री जोशी, प्रा. शिवाजीराव भोसले, बॅ. पी.बी.पाटील, श्री. वि.वि.चिपळूणकर, एस.एम.जोशी, प्राचार्य म. वा. कौण्डिण्य, वनस्थळीच्या निर्मला पुरंदरे, राष्ट्रसेविका समितीच्या लक्ष्मीबाई केळकर, विसुभाऊ बापट, लिलाधर हेगडे, विवेक पंडित,मोहनदास सुखटनकर, अशा अनेक मान्यवरांची भाषणे बाजीपूर अध्यापक विद्यालयाने आयोजित केली. विशेष म्हणजे वरीलपैकी सर्व व्याख्याने व सांस्कृतिक उपक्रम वसईतील रसिकांसाठी खुले होते.

वसईतील अनेक संस्थाशी बाजीपूर अध्यापक विद्यालयाचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे वसईतील एक सांस्कृतिक केंद्र अशी बाजीपूर अध्यापक विद्यालयाची ओळख़ निर्माण झाली.

महाराष्ट्र शासनाने बाजीपूर अध्यापक विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन तत्कालिन प्राचार्य श्री. द. वि. मणेरीकर यांची शिक्षक प्रशिक्षण मंडळ, शासकीय परीक्षा मंडळ, अभ्यासक्रम पुनर्रचना समिती, जिल्हा स्तरावरील शिक्षक राज्य पुरस्कार निवड समिती, पाठ्यपुस्तक मंडळ यावर सदस्य म्हणून निवड केली. एन. सी. आर टी, लोकसंख्या शिक्षण, सूक्ष्म अध्यापन, ऑपरेशन ब्लॅक बोर्ड यासारख्या अभ्यासक्रमाचे विषयतज्ञ म्हणून महाराष्ट्रभर प्राचार्य श्री. द. वि. मणेरीकर फिरले. १९९० मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने एक टास्क फोर्स नेमली. या समितीमध्ये १९ शिक्षणतज्ञ होते त्यात प्राचार्य श्री. द. वि. मणेरीकर सरांचा समावेश होता. हा बाजीपूर अध्यापक विद्यालयाचा शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव होता.

प्राचार्य श्री. द. वि. मणेरीकर सराच्या नंतर प्राचार्यपदी नियुक्त झालेले श्री सुरेश चौधरी सर, श्री. राजेंद्र बंजारा सर यांना सुध्दा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रातील अनेक शासकीय समित्यावर काम करण्याची संधी मिळाली.

error/img
error/img
error/img